भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याकडून ट्रम्प कन्या इव्हाका यांना खास भेट | Lokmat News

2021-09-13 0

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हाका ट्रम्प यांनी मंगळवारी हैदराबादमधील जागतिक उद्योग परिषदेत सहभाग नोंदवला. ह्यावेळी इव्हाका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची भेट ही घेतली. पंतप्रधान मोदी ह्यांनी इव्हाका साठी खास जेवणाचे आयोजन ही केले होते. या कार्यक्रमात इव्हाका यांनी हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदीं ह्यांनी इव्हाका ट्रम्प ह्यांना खास भेटही दिली. मोदींनी इव्हाका यांना लाकडाचा एक बॉक्स भेट म्हणून दिला. या बॉक्सवर गुजरात मधील लोककलेचं पारंपारिक नक्षीकाम करण्यात आलं आहे. ह्या नाक्षीकामाला सडेली क्राफ्ट नावानेही ओळखलं जातं .सुरत जवळच्या परिसरात ह्याचं काम केलं जातं.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires